#स्कूल बॅग,शैक्षणिक साहित्याचे वाटप!
,संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता.खानापूर ) येथील सन २०००सालातील प्राथमिक शाळेतुन उत्तीर्ण हो ऊन गेलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्याकडून ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन गर्लगुंजी गावातील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या व मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी दि. आँगस्ट रोजी करण्यात आले.
यावेळी सन २००० सालच्या बॅचमधील विद्यार्थी सुनील मेलगे, अनिल मेलगे,परसराम गोरे, लक्ष्मण पाटील,जोतिबा सुतार, संदीप वड्डेबैलकर, खेत्रबा मेलगे, संतोष पाटील, नागेंद्र कुंभार या माजी विद्यार्थ्याची उपस्थिती होती.
यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष परशराम चौगुले,पीकेपीएस संघााचे माजी चेअरमन राजू सिध्दाणी, संचालक शांताराम मेलगे,शिक्षण प्रेमी गोकुळ चौगुले, संतोष पाटील, बाबूराव मेलगे,शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यीच्या तकडून राबविलेल्या या उपक्रमाबद्दल गावातून व त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्याकडून कौतुक होत आहे.
