#स्वातंत्र्यदिनाचेऔचित्य साधुन सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजीचे सुपूत्र व भारतीय सैनिक रविराज श्रीदत्त पाटील व श्रेयस मारूती भातकांडे यांचा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन विश्व भारत सेवा समिती संचालित गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील ज्योतिराव फुले विद्यालयाच्यावतीने दोन्ही भारतीय सैनिकांचा सत्कार सोहळा १५ आँगस्ट रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के.एम.पाटील होते.
यावेळी प्रास्ताविक क्रिडाशिक्षक संतोष मेलगे यानी केले.,उपस्थितांचे स्वागत विज्ञान शिक्षक श्री चोपडे यानी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याशाळेचे विद्यार्थी रविराज पाटील व श्रेयस भातकांडे हे नुकताच भारतीय सैन्यात ट्रेनिंग पूर्ण करून आल्या निमित्त हायस्कूलच्यावतीने शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक के एम पाटील म्हणाले की, आपल्या हायस्कूलचे अनेक विद्यार्थी भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.आपल्या देशाची सेवा बजावत आपल्या गावासह हायस्कूलचे नाव व आई वडीलाचे नाव उज्वल करा.असे मत व्यक्त केले.
यावेळी सत्कार मुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक के एम पाटील, विज्ञान शिक्षक श्री. चोपडे, क्रीडा
शिक्षक संतोष मेलगे, श्री कळसेकर, श्रीमती तिरवीर व विद्यार्थी उपस्थित होते.
आभार श्री कळसेकर यानी मानले.
