#आमदारांच्याहस्ते फित कापून उदघाटन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी ( ता.खानापूर ) येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिक भवनाचा उदघाटन सोहळा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन शनिवारी दि.१५ आँगस्ट रोजीमोठ्या
उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निवृत्त कँप्टन पांडुरंग मेलगे होते.अवरोळी मठाचे स्वामी श्री श्री चन्नबसव देवरू यांच्या सानिध्यात पार पडलेल्या कार्यक्रमाला म ए समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी बेळगाव मा जी सैनिक संघटनेचे कृष्णा नौकुडकर,
,निरंजन सरदेसाई, डी आर सिंघानी,व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत निवृत्त सुभेदार गोपाळ देसाई यानी केले.
उपस्थित मान्यवराच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तर खानापूर तालुक्याचे आमदार यांच्याहस्ते फित कापून सैनिक भवनाचॆउदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना खानापूर तालुक्याचे आमदार म्हणाले की, मा जी सैनिक संघटनेने नोंदणी ही कायदेशीर करून घेणे गरजेचे आहे.त्यामुळे नोंदणीकृत संघटनाना सरकारी सवलतीचा लाभ मिळविण्यास मदत होते.त्यासवलती मिळवुन देऊ असे आश्वासान दिले.
तर निवृत एअरफोर्स अधिकारी बी.आर.सिंगारे यानी संघटनेला ५० हजार रूपयाची देणगी जाहिर केली.
कार्यक्रमाला माजी सैनिक संघटना कित्तूर,बिडी,मच्छे,सांबरा,उपस्थित होत्या.यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
