#विद्यार्थ्याचे संस्कृतीक कार्यक्रम संपन्न!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप (ता. खानापूर ) येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेत ८० वा स्वातंत्र दिन सोहळ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष विश्वनाथ पाटील होते.प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरीक कलराम पाटील,लक्ष्मण पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, माजी ग्राम पंचायत सदस्या सौ.माया कुंभार, गुरूनाथ कुंभार, दुद्धाप्पा कुंभार,माजी तालुका पंचायत सदस्या सौ कविता कुंभार, एसडीएमसी उपाध्यक्षा सौ.चित्रा कुंभार, इतर सदस्य,निवृत्त शिक्षक पुंडलीक कुंभार,प्रताप मुरगोड आदी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थ्यानी गावातुन प्रभात फेरी काढली.
यावेळी एस डी एम सी अध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांच्याहस्ते ध्वजा फडकाविण्यात आला.तर उपस्थित पाहुण्याच्याहस्ते फोटो पुजन करण्यात आले. दीपप्रज्वलन कलराम पाटील व इतर मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक अतिथी शिक्षक नामदेव कुंभार यांनी केले, तर मुख्याध्यापक प्रकाश कुंभार यानी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन गावचे सुपूत्र निवृत्त शिक्षक पुंडलिक कुंभार व प्रताप मुरगोड यांचा फेटा, शाल, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यानी स्वातंत्र दिनानिमित भाषण केले.तर सत्कारमुर्ती पुंडलिक कुंभार व प्रताप मुरगोड तसेच माजी विद्यार्थी यल्लापा कुंभार आदीची भाषणे झाली.
यावेळी विद्यार्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.यावेळी कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद युवक मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिथी शिक्षक नामदेव कुंभार यानी केले.आभार कन्नड शिक्षिका सौ.एल डी नलवडी यानी मानले.


