संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी ( ता.खानापूर ) येथे नव्याने उभारण्यात नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिक भवनाचा उदघाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन उद्या शनिवारी दि.१५ आँगष्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैप्टन पांडुरंग मेलगे उपस्थित राहणार आहेत.तर सैनिक भवनाचे उदघाटन खानापूर तालुक्याच्या आमदारंच्याहस्ते होणार आहे.
यावेळी दिपप्रज्वलन प पू श्री चन्नबसराय देवरू,तहसीलदार दुंडाप्पा कोमार,
सीपीआय लालसाब गवंडी,डाॅ.रवी पाटील , सु.मेजर,कृष्णा नौकुडकर बी आर सिंगारे, पीडीओ रेष्मा पानीवाले आदीच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला तालुक्यातील माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
