#खानापूरातील सरकारी माता व बाल रूग्णालयाला भेट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) राहुल शिंदे यानी खानापूर तालुक्याचा दौरा गुरूवारी दि ५ जुन रोजी केला.
यावेळी खानापूर शहरात नव्याने २० कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या माता व शशु (बाल) रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली .
यावेळी जेष्ठ डाॅ.नारायण वडिमनी यानी सीईओ राहुल शिंदे याचे स्वागत केले.
नविन बांधण्यात आलेल्या हाॅस्पिटलची पाहणी केली.डाॅ.नारायण वडिमन्नी यानी हाॅस्पीटलची माहिती दिली.
यावेळी सरकारी हाॅस्पिटलचा खर्च दिवसेदिवस वाढत त्यामुळे समस्या होत असुन हाॅस्पिटलमध्ये बेड चार्जीस लावण्याबदल चर्चा केली. याशिवाय नविन डाॅक्टराची नेमणूका होत आहे. शिवाय रूग्णाची संख्या ही दिवसे दिवस वाढत.
तसेच डोळ्यांच्या आँपरेशनची सरकारी हाॅस्पिटल मध्ये आहे.
यासाठी हाॅस्पिलच्या खर्चासाठी निधी वाढवुन देण्याची मागणी केली.तसेच कर्मचार्याच्या नेमणुकी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) राहुल शिंदे यानी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू.असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा पंचायतीचे पथक तसेच डाॅक्टर उपस्थित होते.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) राहुल शिंदे यानी खानापूर सरकारी हाॅस्पिटलाच्या व्यवस्थनाबद्दल समाधान व्यक्त केले.