मच्छे लक्ष्मीनगर मराठी शाळेत सेवानिवृत्त सत्कार सोहळा संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या ३१ वर्षात मी ज्या ज्या शाळेत शिक्षिका म्हणून सेवा बजावली.त्याशाळेतुन माझ्या हातुन शिकुन गेलेले विद्यार्थी आजउच्च पदावर कार्यरत आहेत.ते आदराने मला भेटून माझ्याबद्दल आदर करतात.हीच माझी गुरू दक्षिणा आहे.
मी संपत्ति मिळविली नाही. मात्र अनेक विद्यार्थ्याची मने जिंकली,त्यानी मला मान सम्मान दिला ही माझी खरी संपत्ती समजतो.आज शिक्षकी सेवेतुन निवृत्त होताना, अनेक बरे वाईट अनुभव अनुभविले आहेत. शिक्षकी सेवेबरोबर माझ्या कुटूंबातुन ही माझा आदर आहे.त्यामुळे स्वताला भाग्यवान समजते.असे मनोगत मच्छे लक्ष्मीनगर(ता.बेळगाव) सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सहशिक्षिका सौ निला बाळेकुंद्री यानी आपल्या सेवानिवृत्ती सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष सुनिल दशरथ चौगुले होते.व्यासपीठावर मुख्याध्यापक जे डी रेमाणी, सत्कारमुर्ती सौ.निला बाळेकुंद्री, व सुरेश पाटील ,माजी अध्यक्ष शांताराम पाटील,भाऊ सुळगेकर,तुकाराम सुतार,अरुण नावगेकर, सुभाष दोरकाडी, देवदास सुतार,श्री.बेळगावकर, सौ.अश्विनी काकतकर,सौ.गीता नागले, लक्ष्मी कंग्राळकर, सोनाली मुतगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक जे.डी.रेमाणी यानी केले.
यावेळी सत्कारमुर्तीसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन करण्यात आले.
सत्कारमुर्ती सौ.निला बाळेकुंद्री व पती सुरेश पाटील यांचा सत्कार एस डी एम सी कमिटी, शाळा मुख्याध्यापक , शिक्षक व विद्यार्थी तसेच विविध शाळा मुख्याध्यापक,शिक्षक तसेच आप्तेष्ठ व मित्र मंडळ आदीच्यावतीने शाल,पुष्पहार, व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरानी सत्कार मुर्ती सौ.निला बाळेकुंद्री यांच्या शिक्षकी सेवेतील उत्कृष्ट कार्या बद्दल गौरव उदगार काढले.
तर शाळेच्या सहशिक्षिका सौ. रूपा मिरजकर यानी सत्कारमुर्ती सौ.निला बाळेकुंद्री यांचा परिचय वाचन केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षिका एस वाय कोवाडकर यानी केले.तर आभार श्रीमती एम एस गाणगेर यानी मानले.
