काॅग्रेस नेते सुरेश जाधव
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधि
स्वतःच्या खानापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि शेतीसाठीच्या पाण्याची व्यवस्था प्रथम झाली पाहिजे. त्यानंतर जर पाणी शिल्लक राहिले, तरच ते इतरांना द्यावे.
अशी अक्रमक भुमिका खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाने घेतली आहे.असे मत कांग्रेस नेते सुरेश जाधव यानी व्यक्त केले.
ते म्हणाले की, खानापूर तालुक्यात मात्र उलटी गंगा वाहताना दिसत आहे. आधी इतरांना पाणी दिले जाते आणि नंतर तालुक्याला मिळेल तेव्हा मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामागचे कारण काय? तालुक्याचे राजकीय नेतृत्व साटेलोट्यात अडकले आहे का? की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पाण्याचा सौदा करून ते जाणीवपूर्वक मौन बाळगत आहे? अशी रास्त शंका खानापूरकरांच्या मनात निर्माण होत आहे.
स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भविष्यात संपूर्ण तालुका पाण्याअभावी वाळवंट झाला तरी चालेल, असा संकल्प लोकप्रतिनिधींनी केला आहे का?
राजकीय साटेलोटे इतके घट्ट झाले आहे का की मलप्रभेचे पाणी वळविल्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सातत्याने बातम्या येत असूनही लोकप्रतिनिधी एकही शब्द बोलण्यास तयार नाहीत?
खानापूर तालुक्यातील भाजपचे सर्व नेते तसेच भाजपा एकीकरण समितीही या कथित पाणीप्रकरणी मौन का बाळगून आहे? याचे उत्तर जनतेला मिळायला नको का?
आज जर मलप्रभेच्या पाण्यावरील कथित अन्याय किंवा बेकायदेशीर वळवणूक थांबवली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या भावी पिढीला भोगावे लागतील. हे तालुक्यातील राजकीय स्वार्थ जोपासणाऱ्या नेत्यांना कधी समजणार?
वेळ अजून गेलेली नाही. खानापूर तालुक्यातील जनतेने आता तरी जागे होऊन स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना जाब विचारलाच पाहिजे.
आधी खानापूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा मग तो पिण्याचा असो किंवा शेतीचा असो तो आधी सुटला पाहीजे आणि मग जर पाणी शिल्लक रहात असेल तर मग इतरत्र देण्यास विरोध असायचे कारण नाही
ही भूमिका खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस ची आहे …..
त्यामुळे खानापूरच्या पाण्यावर जर दुसरे भलतेच कोणी आधी डल्ला मारत असेल तर खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस गप्प बसणार नाही.असे ते म्हणाले.
