#वन खात्याकडुन जागृती महत्वाची !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
निसर्ग टिकायचे असेल तर प्रत्येकाने झाडे लावुन ती टिकविली पाहिजेत तरच निसर्ग टिकेल.जर निसर्ग टिकला तर पाऊस पडेल. पर्यावरण स्वच्छ राहिले, माणसाला भरपूर आँक्सीजन मिळेल. यासाठी वन खाते जनमाणसात राहुन जनतेला झाडे लावा झाडे जगवा.यासाठी प्रयत्न करत नाही. तो पर्यत तो झाडांची संख्या वाढत नाही.
मात्र याकडे वनखाते साफ दुर्लक्ष करते. वर्षातुन एकदा जागतिक पर्यावरण दिना दिवशी वनखाते खडबडुन जागे होते. एक दिवस कुठंतरी पर्यावरण दिन साजरा करते .
वर्षे भर झाडे लावणे विसरून जाते.अशाने निसर्ग टिकत नाही.यासाठी वर्षभर झाडे लावा.झाडे जगवा. हे ब्रिद वाक्य टिकवुन ठेवुन निसर्गाचे पालन केले पाहिजे.
असे मत तालुका ब्लाॅक क्राँग्रेस अध्यक्ष व बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी म.मं.महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उदघाटन वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश चंद्रशेखर तळवार यांनी रोप लावुन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक वनरक्षक सुनिता निंबर्गी,आरएफओ श्रीकांत पाटील होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून दिवाणी न्यायाधिश विरेश हिरेमठ प्राचार्या जयश्री अंची,अक्षय वाली,रेश्मा बुरूड,देवराज सल्यागोळ,अँड एम वाय कदम,तसेच बार असोसिएशनचे सदस्य,वकिल संघटना अध्यक्ष,तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते.