#खानापूरात व्ही वाय चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजात विद्यार्थ्याचे स्वागत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
आजच्या युगात तांत्रिक शिक्षण हे अत्यंत गरजेचे शिक्षण आहे.यासाठी विद्यार्थ्यानी भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहुन ती साकार करण्यासाठी कठोर परिश्रमाची जोड द्यावी.असे विचार डॉ.एस. आर.पाटील यानी खानापूर व्ही.वाय.चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजात प्रथम वर्ष विद्यार्थ्याच्या स्वागत समारंभात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष पंढरी परब होते.
प्रारंभी प्राचार्य शिरीष केरूर प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी व्यासपिठावर संचालक डाॅ.दामोदर वागळे, .निवृत्त प्राचार्य बी एल मजुकर,गजानन धामणेकर, प्रकाश चव्हाण, सल्लागार डाॅ.जी आर उडपी, विवेक गीरी,प्रा.शरयू कदम,सचिव सत्यव्रत नाईक,महेश ईनामदार,डाॅ.डी एन मिसाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
यावेळी बोलताना डाॅ.डी एन मिसाळे म्हणाले कि,आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात व बदलत्या जगात रोजगारच्या संधी उपलब्ध होतील याकरीता विद्यार्थ्यानी ध्येय ठरवून वाटचाल करावी.असे आवाहन केले.
तर अध्यक्षिय भाषणात बोलताना म्हणाले कि कै.बाबूराव ठाकुर यानी शंभर वर्षापूर्वी ग्रामीण भागात ज्ञान गंगा पोहचविण्याचे काम केले.याच पध्दतीने डाँ.किरण ठाकुर यानी दुर्गम भागातील विद्यार्थ्याना तांत्रिक महाविद्यालय सुरू केले आहे.याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी व्ही वाय चव्हाण पाॅलिटेक्निक काॅलेजच्या विद्यार्थ्यानी उत्तम गुणवतेसह उतीर्ण झाल्याबद्दल मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी, पालक,प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राघवेंद्र मडवाळकर व अश्विनी घाडी यानी केले.आभार रोहित वाघमारे यानी मानले.
