संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर मराठा मंडळ हाय्यर सेकंडरी स्कूलमध्ये पालक मेळावा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. व्ही. कुलकर्णी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक महादेव कदम व सौ सावी पाटील उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
य़ावेळी बोलताना पालक महादेव कदम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा किंवा पालकांनी आपल्या मुलांच्या सोबत कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन केले. व पालक आणि विद्यार्थ्यांचे मधील स्नेहभाव अतूट राहावा. पालकांनी आपल्या मुलांच्या बरोबर मित्रासारखे वागावे.असे सांगताना आज-काल मुलं मोबाईलच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत मोबाईलचा वापर चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारे होतो तर विद्यार्थ्यांनी मोबाईल मधील चांगले आत्मसात करावे. व आपले ज्ञान वाढवण्यासाठी उपयोग करावे असे सांगितले.
तर पाहुण्या सौ.सावी पाटील म्हणाल्या भाषणावरून शाळेमध्ये शिक्षक शिकवतात विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकणे जे काही प्रश्न असेल तर शिक्षकांना विचारून उत्तर मिळविणे याचे लक्ष द्यावे तसेच पालकांनी घरी आपली मुलं आल्यानंतर आज शाळेत झालेल्या विविध विषयाबद्दल चौकशी करावी पालकांनी शाळेचे चांगले नाते ठेवावेत असे सांगत असतानाच शिक्षक विद्यार्थी पालक तिघे एकत्र आले तर विद्यार्थी भविष्य उज्वल होतो असे सांगितले
याविषयी बोलताना ज्येष्ठ शिक्षक टी आर पत्री म्हणाले की, वारंवार पालकांनी शाळेत भेट देऊन आपल्या मुलांची चौकशी करावी असे सांगितले .
शेवटी अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक श्री के.व्ही कुलकर्णी म्हणाले की,यावर्षी होणाऱ्या सर्व कार्यक्रमाच्या बद्दल थोडक्यात माहिती करून दिली. विद्यार्थ्यांनी रोज शाळेत नियमित या वे .हजेरी अत्यंत आवश्यक असते. व सरकार कडून देण्यात येणारे एच.पी. व्ही, व्हॅक्सीन बद्दल सविस्तर माहिती सांगुन , आपल्या मुलांकडे पालकाने आवर्जून लक्ष देण्याचे आवश्यकता आहे.हे सांगत असतानाच मुले घरी आल्यावर मुले अभ्यास करतात की नाही याचे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. एस बी. भातकांडे यानी केले.तर आभार सौ. रेखा लक्केबैलकर यांनी मानले.
