संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मडवाळ हलशी रस्त्यावरील नाल्याजवळील रस्त्याचा भाग खचल्याने वहातुकीला धोका निर्माण होण्याचा संभव वाटत आहे.
नुकताच झालेल्या पावसाने रस्त्याचा एका बाजुचा भाग खचला असुन भविष्यात मुसळधार पास झाला तर या रस्त्यावरची वाहतुक पूर्ण ठप्प होण्याची शक्यता वाटत आहे.त्यामुळे याभागातील जवळपास दहा गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारीवर्गाने त्वरित प्रत्यक्षात पाहणी करून दुरूस्तीची करावी.अशी मागणी याभागातील नागरीकातुन होत आहे.
गेल्यावर्षी रस्त्याच्या दुसर्याबाजुने मोठी पडझड झाली होती.तर नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने उलट बाजुने रस्ता खचत असल्याने वाहनधारकातुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाल्याजवळच्या असलेल्या या अरूंध्द रस्त्यावरून मडवाळ, हलशी,देवराई, घोटगाळी,रेडेकुंडी,तारवाड,रंजनकोडी,
शिवठानआदी गावचा संपर्क होतो.
सध्या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढत आहे. त्यामुळे भविष्यात मुसळधार पास झाला तर या रस्त्यावरील वाहतुक पूर्ण बंद होण्याची दाट शक्यता आहे.
दरवर्षी या रस्त्याला नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक वर्षापासुन या मार्गाचे रूंध्दीकरण करणे राहुण गेले आहे.तेव्हा कायमस्वरूपी पक्का रस्ता करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबााहेब देसाई मडवाळ, महादेव फटाण,किसन बिलगावडे,मारूती कदम,गणपती बिलगावडे,नागेंद्र कोलकार,नामदेव वीर,नारायण फटके,पांडुरंग फडके,पांडुरंग मोगरे,यल्लापा सुंडकर,बडकु मोहरे आदी नागरीकातुन होत आहे.