#नगरपंचायतीकडुन होणार कारवाई!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात लाखो रूपये खर्च करून आमदार फंडातुन सी सी रोड केला, स्पीड ब्रेकर केले.त्यामुळे विद्यानगरातील नागरीकाचा गेल्या २० वर्षाच्या काळातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला.
नागरीकांच्या अनेक वर्षापासुनच समस्या सुटल्या, परंतु विद्यानगरात सी सी रोड बरोबरच तयार केलेला स्पीड ब्रेकर फोडुन रस्त्याची नासधुस केली.
या बाबत विद्यानगरातील नागरीकातुन नाराजी पसरली आहे.तेव्हा नगरपंचयातीने संबंधित सी सी रोड व स्पीड ब्रेकरची पाहणी करून सबंधीतावर कारवाई करावी. व पुर्वत स्पीड ब्रेकरची व्यवस्था करावी. अशी मागणी विद्यानगरातील नगरीकातुन होत आहे.