संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोरगल संस्थानाचे कलियुग कर्ण म्हणून प्रसिद्ध असलेले महाराज नरसोजीराव शिंदे यांची ११६ वी जयंती नुकताच उत्साहात सा जरी करण्यात आली.
शेकडो जमीन दान करने,रामदुर्ग तालुक्यात उसाची लागवड करण्याचे प्रथम श्रेय घेतलेले, परदेशी शासनपध्दतीचा अवलंब करून गरीब शेतकर्याना हजारो एकर जमीन दान करणार्या महाराज नरसोजीराव शिंदे यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पसरले होते.
महाराज नरसोजीराव शिंदे यांचा जन्म दि.७ जुलै १९१० रोजी रामदुर्ग तालुक्याच्या तोरगल गावच्या सात तटबंदीच्या किल्ल्यात झाला.
बालपणीच आईवडील क्षेत्र हरवल्याने कोल्हापुरचे शाहु महाराज यानी नेमलेल्या एम ई पॅटरसन नावाच्या दाईच्या देखरेखे खाली त्यांचे पालन पोषऩ झाले.वयाच्या सहाव्या वर्षी ते शिक्षणासाठी कॅनडाला गेले.ते वयाच्या १८ व्या वर्षी परत मायदेशी परतले.
त्यानंतर त्यानी महाराष्ट्रातील पाचगणी व बेंगळूर येथे उच्च शिक्षण घेतले.पुढे १९३१ मध्ये त्यानी कोल्हापूरचे छत्रपती शाहु महाराजांच्या भावाची कन्या सुवर्णादेवी हिच्याशी विवाह केला.तर ३ जुन १९३२ रोजी रामदुर्गा किल्ला येथे नरसोजीराव यांचा तोरगल्ला संस्थानाचे राजे म्हणून राज्यभिषेक झाला.त्यानी लोकांच्या कल्याणासाठी प्रशासकीय बदल घडवून आणले.हा बदल घडवुन आणण्याकरीता त्यानी कॅनडा,जपान,श्रीलंका,चीन,व इतर देशाना भेटी दिल्या,व तेथील प्रशासकीय पध्दती ,कायदे व नागरीकांना दिलेले विशेषाधिकार लागु केले.प्रशासनात सुधारणा करण्यासाठी त्यानी तोरगल संस्थानातील ३६ गावाकरिता ९ इनामदरांची नियुक्ती केली.त्यानी सर्व गावातील नागरीकांचे हालअपेष्टा आणि नुकसान ऐकुन घेतले. व सुज्ञपणे शासन केले.जेणे करून ब्रिटिश सरकार टी या करांचा बोजा थेट लोंकाच्यावर पडणार नाही.१९५२ मध्ये गोदीची गावात वीरभद्र मंदिर बांधले,चंदरगीत क्रीडाशाळा स्थापन केली.गोदाची वीरभद्र मंदिराची सर्व कामे आजसुध्दा शिंदे घराण्याच्या वंशजाच्या नेतृत्वाखाली केली जातात.