#आम.हलगेकर यांचे कृषीक समाज बैठकीत आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
देशाचा मजबूत कणा म्हणजे शेतकरी तोच कणा जर मजुबत नसेल तर देशाची प्रगती म्हणावी तशी होणार नाही.कारण देशाची आर्थिक स्थिती शेतीवर अवलंबुन असते,शेतकरी हा अन्नदाता असुन, स्व: ता कष्ट करून सर्व जनतेला अन्नदान करणारा शेतकरी चांगले पिक पिकवुन जास्तीत जास्त प्रणानात उत्पादन मिळविण्या करीता अनेक योजना आखल्या आहेत.
तसेच शेतकर्यानी आपल्या पिकांचा विमा करून घेणे ही महत्वाची जबाबदारी आहे.
तेव्हा येत्या ३१ जुलै २०२६ पर्यत संबधित कार्यालयात विमा उतरून लाभ घ्यावा.असे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी सोमवार दि.६ रोजी तालुका कृषि कार्यालयात बोलविलेल्या कृषिक समाज बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
प्रास्ताविक व स्वागत सहाय्यक कृषी निर्देशक डी बी चव्हाण यानी केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की,खानापूर तालुक्यात प्रमुख पिक हे भात आहे.तेव्हा शेतकर्यानी भात पिकासाठी विम्याची रक्कम ८८० रूपये भरून लाभ घ्यायचा आहे,शेंगा पिकासाठी विम्याची रक्कम ५३० रूपये भरून लाभ घ्यायचा आहे.मक्का पिकासाठी विम्याची रक्कम ५४६ रूपये भरून लाभ घ्यायचा आहे.असे सांगुन कृषी खात्यातर्फे मुख्य योजना ,बी -बीयाणे वाटप,पाणी पुरवठा योजना,माहिती सांगीतली,तसेच बागायत खात्याकडुन शेतकर्यासाठी राबविण्यात योणार्या योजना,तसेच पशु पालन व पशुसंगोपन खात्याकडुन येणार्या योजना,वनखात्याकडुन येणार्या योजणाबदल चर्चा केली.
यावेळी व्यासपिठावर कृषक समाज अध्यक्ष कुमार भिमगौडा, रमेश पाटील,गंगाधर होसुर,माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, विमा अधिकारी सतीश सुरोजी व इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी बागायत खात्याचे अधिकारी, वनखात्याचे अधिकारी,इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुका सहाय्यक कृषि निर्देशक डी बी चव्हाण यानी विविध योजना बद्दल माहिती दिली.व आभार मानले.
