#दुचाकी स्वारचा मृत्यू!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर पारिश्वाड रोड वरील लोकोळी क्राॅसवर टिप्पर व दुचाकी आपघातात दुचाकीस्वार सातेरी बाबाजी गुरव (रा.लोकोळी) यांचा मृत्यू झाला.
या बाबत घटना स्थळावरून मिला ले ली माहिती अशी की, सातेरी गुरव हे लोकोळी गावातुन आपल्या दुचाकीवरून शेताकडे जात असताना पारिश्वाडकडुन खानापूरकडे भरधाव वेगाने जाणार्या टिप्परने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला.लागलीच त्याना उपचारासाठी बेळगावला घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.पुढील चौकशी सुरू झाली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव येथे पाठविण्यात आला आहे.
सातेरी गुरव यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सातेरी गुरव याच्या मृत्यने लोकोळी गा वा वर शोककळा पसरली आहे.
