#नागरीकाना समाधान उत्तरे न मिळाल्याने निरूत्साह !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी ( ता. ,खानापूर) येथील नागरिक प्रल्हाद देवलतकर यांच्या घरासमोरून उच्च दाबाच्या विधूत तारा गेल्या आहेत.याचा धोका नागरीकाना होणार आहे.तेव्हा विधुत खाब घरापासुन दुर उभा करा.अशी मागणी यावेळी केली.मात्र अधिकार्याकडुन समर्पक उत्तरे न मिळाल्याने नागरीक निरूत्साह झाले.अशा एकूण ७ तक्रारी आल्या होत्या.
खानापूर येथील हेस्काॅम कार्यालयात शनिवारी दि २० रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० यावेळीत ग्राहक मेळाव्याचे आयोजन पार पडले.
ग्राहक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी
हेस्काॅम कार्यालयाचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले उपस्थित होते.
यावेळी रू मे वा डी येथील सीताराम बेड़रे यानी आपल्या सर्वे नंबरल३३ मधील शेतातील विधुत सांप बदलुन द्यावा.अली मागणी केली. खानापूर येथील दीपक वाळवे यानी स्वामी समर्थ मंदिरजवळील टी.सी ला झाडाझुडूपानी वेढले आहे.तेव्हा टी सी सुरक्षित करा. डुक्करवाडी येथील भैरू कुंभार यानी गावात बसविण्यात आलेल्या टी सी ला वेली झाडे झुडपानी वेढलेले तेव्हा टी सी बाजुला करा.
मुडेवाडी येथील रमेश देसाई यानी जुने खांब बदलुन नवीन खांब उभे करा.
बेकवाड येथील कल्लापा ओळकर यानी आपली तक्रार मांडली.
खानापूर येथील जयराम पाटील यानी शेतातील पडलेले खांब नव्याने उभा करा अशी मागणी केली.
ग्राहक मेळाव्याला सहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले,आकाऊट आँफिसर बी.ए धर्मादाय,सहाय्यक अभियंते एस सी अंगडी,लक्ष्मी रंगनाथ ,भरतेश नागपुर,नागेश देवलतकर,विराय्या चक्रीमठ,बसवराज हावळ,शिवाप्पा मुरगोड,जाविद नाईकवाडी आदी उपस्थित होते.

