#वाहनधारकना आडथळा, आपघाताला आमंत्रण!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
पणजी बेळगाव महामार्गावरील गुंजीजवळ रस्त्यातच वाहनातील कचरा पडण्याचा प्रकार वारंवार होत आहे.
गोवा राज्यातुन येणार्या वाहनातुन शहरातील कचरा आणला जातो.तो बेळगाव मार्ग घेऊन जाताना वाहनात प्रमाणाच्या बाहेर भरल्यामुळे गुंजी गावच्या वेशीजवळ वाहनातु कचरा पडण्याचा प्रकार होत आहे..हा प्रकार वारंवार घडत आहे.
याप्रकारामुळे गुंजी गावच्या नागरीकाना याकचर्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
एवढेच नव्हे या कचर्यामुळे
वाहन धारकाना वाहने चालविताना त्रास होत आहे.तर या कचर्याकडे बेवारस कुत्री धावतात अशा वेळी दुचाकी वाहन धारकाना आपघाताशी सामना करावा लागत आहे.
तेव्हा पोलिस खात्याने याकडे लक्ष देऊन गोव्याहुन येणार्या कचर्यागाड्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी गुंजी ग्रामस्थातुन होत आहे.
प्रतिक्रिया:
गोव्याहुन कचरा घेऊन बेळगावकडे जाणार्या वाहनातील कचरा प्रमाणाबाहेर भरला जातो. ही वाहने अतीवेगाने जात
असल्याने गुंजी गावाजवळील रस्त्यावर पडला जातो.हा प्रकार वारंवार घडत आहे.याचा शोध पोलिसानी लावुन त्याच्यावर कडक कारवाई करावी.
अन्यथा महामार्गावर रास्ता रोको करून निषेद करण्यात येईल.
पंकज कुट्रे, गुंजी
