संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधि
फुलेवाडी (ता .खानापूर )गावात कुंभार समजातील कलाकारांना ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रम मंगळवार (दि.१६) रोजी गावातील महात्मा फुले ग्राम विकास मंडळाच्या कार्यलयात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार होते.
केंद्र सरकारकडून कुंभार समाजातील कलाकारांना ओळखपत्र मिळण्याची सोय आहे. भारतात सर्व व्यवहार ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहेत. भविष्यात केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या योजनेचा थेट लाभ मिळवण्यासाठी या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे. यासाठी कुंभार समाजातील प्रत्येक व्यक्तीने कलाकार ओळखपत्र बनवून घ्यावे. यासाठी मंडळ तुम्हाला सहकार्य करणार आहे.अशी माहिती भैरु कुंभार यांनी दिली.
कलाकार ओळखपत्र वितरण प्रसंगी महात्मा जोतिबा फुले ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय पाटील, हलकर्णी ग्राम पंचायत माजी उपाध्यक्षा उज्वला कुंभार, ग्राम पंचायत सदस्य रवी मादार, शिवाजी कुंभार, निवृत्त सैनिक सातेरी कुंभार, गणपती कुंभार, विष्णू कुंभार, रमेश कुंभार, सागर कुंभारसह गावातील कुंभार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कलाकार ओळखपत्र मिळवण्यासाठी संपर्क साधा
भैरु कुंभार : 9743584328
सोमनाथ कुंभार : 9686707210
परशराम पालकर : 8123816749
रेखा कुंभार : 9743743760
