#खानापूर अतिवृष्टी पूर्वभावी सभेत विविध विषयावर चर्चा!
“पत्रकाराना बैठकीची माहिती दिली नाही.पत्रकारांची अनुपस्थिति”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अती पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो.अशा तालुक्यात अतिवृष्टीमुळे जीवित हानी, शेतीचे नुकसान, घरांची पडझड, या घटनापासुन सावधगीरी बाळगावी.यासाठी मंगळवारी दि.१६ रोजी सकाळी तालुका पंचायतीच्या सभागृहात अतिवृष्टी पूर्वभावी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायतीचे चीफ आकाऊंटंट आँफिसर परशराम दुडगंटी उपस्थित होते.
व्यासपिठावर तहसीलदार दुंडाप्पा कोमार, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हापंचायतीचे चीफ आकांऊटटं आँफिसर परशुराम दुडंगट्टी म्हणाले, की खानापूर तालुक्यातील सर्व अधिकारी अतिवृष्टी पूर्वभावी बैठकीला जाती निशी हजार राहिले पाहिजे. अन्यथा त्याना नोटीसा धाडा, असे सांगीतले.यावेळी बीईओ कार्यालयाचे अधिकारी दिसुन आले नाही.याशिवाय इतर अधिकारी गैर हजार असतील तर त्यांची गय करू नका.
खानापूर तालुक्यात दरवर्षी अतिवृष्टीमुळे मल प्रभा नदी सह इतर नद्याना मोठा पूर येतो.तेव्हा अधिकार्यानी सतर्क राहिले पाहिजे.रस्ते,शाळ इमारतीच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अतिवृष्टी काळात तालुका अधिकारी वर्गाने २४ तास कार्यरत राहणे,
गावाना पुराना वेढा आला तर विद्यार्थी वर्गाची आडचण दुर करणे,ग्राम पंचायती कडुन गटारी स्वच्छ ठेवणे , शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय ठेवणे,शहरातील विद्यार्थ्याचे हाॅस्टेली स्वच्छता राखणे,
पावसामुळे घराची पडझड झाल्यास १०० टक्कर नुकसान भरपाई मिळवून द्यावी,अशा सुचना केल्या.
पशु खात्याच्या वतीने जनावरांची काळजी घेणे, नवीन रोगाची लागण झाल्यास जनावरानी उपचार लस आदी उपचार करणे,
हेस्काॅम खात्याने विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तयारीत राहणे.टी सी बदलने, खांब्याजवळील, ताराना लागुन असलेल्या फांद्या वनखात्याकडुन दुर करून घ्या.अति वृष्टीमुळे वीज पुरवठ्याकडे जातीने लक्ष देने,आदी सुचना केल्या.
तालुका आरोग्य खात्याकडुन नवीन रोगाची लागन होऊ नये .याची खबरदारी घ्यावी.जनजागृती करावी.अशी सुचना टीएचओना दिली.
शिक्षण खात्याने मोडकळी आलेल्या शाळा इमारती,शाळांची पाण्याने भरणारी पटांगणे याकडे लक्ष दिले पाहिजे.
अतिवृष्टी काळात तालुका अधिकार्यानी आपले क्वाटर्स सोडुन २४ तास सोडुन जाऊ नये.
अतिवृष्टी पूर्वभावी बैठकीची माहिती पत्रकाराना दिली नाही!
दर वर्षी अतिवृष्टी पूर्व भावी बैठकीची माहिती देऊन बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती करतात.मात्र तालुका अधिकार्याना यंदा याचा विसर पडला.
त्यामुळे एक ही पत्रकार बैठकीला उपस्थित नव्हता.
बैठकीला केवळ तालुका अधिकारी पशुखात्याचे डाॅ.मनोहर दादमी, तालुका आरोग्य अधिकार डाँ.महेश किवडसनावर, हेस्काॅम खात्याचे कार्यकारी अभियंतेप्रवीण बरगाले, व इतर अधिकारी तसेच ५१ ग्राम पंचायतीचे पी डी ओ उपस्थित होते.
