#नागरीकाना सहन करावा लागला त्रास!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर जांबोटी रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात झाली आहे.मंगळवारी जांबोटीत आठवडी बाजार असतो.या दिवशी जांबोटी परीसरातील अनेक खेड्याचे,गवळीवाड्याचे
लोक आठवडी बाजारासाठी जांबोटीत मोठ्याने गर्दी करतात.
तेव्हा मंगळवारी दि.१६ रोजी जांबोटीत आठवड्याचा बाजार असल्याने एकीकडे नागरीकाची गर्दी तर दुसरीकडे डांबरीकरणाच्या कामाचा गोंधळ जांबोटीतील महामार्गावरील रस्त्यावर एकच गर्दी त्यातच आवजड वाहनाची वर्दळ त्यामुळे संबधीत खात्याच्या डांबरीकरण कामाचा व्याप सर्वानाच सहन करावा लागला.
संबंधित खात्याच्या कमत्राटदारानी काम करत असलेल्या रस्त्याच्या संदर्भात कोणती आडचण आहे.,का ?याची साधी चौकशी तरी करावी.जेणे करून डांबरीकरणावेळी नागरीकांचा त्रास, वाहतुतीची आडचण होणार नाही.परंतु याकडे संबधीत खात्याच्या कमत्राटदार दुर्लक्ष करून जांबोटीतील महामार्गावर निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करून मोकळे झाले.परंतु याचा त्रास मात्र याभागातील नागरीकाना सहन कराना लागणार आहे.
ख
