#सख्खेभाऊ बहिण डाॅ दर्शन नाडगौडा,डाॅ.हरिता नाडगौडा!
#मुळचे नागवे (ता.चंदगड) गावचे!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर डाॅक्टर एसोसिएशनचे अध्यक्ष व मुळचे नागवे (ता.चंदगड) गावचे सुपूत्र डॉ डी.ईं.नाडगौडा यांचे पुतण्या व पुतणी दोन्ही सख्खे भाऊ बहिण डाॅ.दर्शन गोविंद नाडगौडा व डाॅ.हरिता गोविंद नाडगौडा यानी एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आपल्या नागवे(ता. चंदगड)
गावचे नाव उज्वल केले.आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवून काकाप्रमाणेच डाॅक्टर झाले.याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
खानापूर डाँक्टर एसोसिएशन अध्यक्ष डॉ डी.ई.नाडगौडा यानी डाॅक्टरची पदवी घेऊन गर्लगुंजी ( ता.खानापूर) गावातुन सेवा केली.त्यानंतर त्यानी खानापूर शहरात गेली कित्येक वर्षे डाॅक्टर सेवा करतात.
आपल्या प्रमाने आपल्या भाऊच्या मुलानी डाॅक्टर सेवा करावी. अशी त्यांची ईच्छा होती.
,त्याप्रमाणे त्यांचा पुतण्या डाॅ दर्शन नाडगौडा याने प्रथम वैद्यकीय शिक्षण घेत एमबीबीएस पदवी घेतली.भाऊच्या पावलावर पाऊल ठेवत धाकटी बहिण डाॅ.हरिता नाडगौडा हिने वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत एमबीबीएस पदवी घेतली.
नागवे(ता.चंदगड) गावच्या नाडगौडा शेतकरी कुटूंबात तीन डॉक्टर!
नागवे( ता.चंदगड) गावच्या नाडगौडा या शेतकरी कुटूंबात तब्बल तीन डाक्टर झाले.
पहिले डाॅ.डी ई नाडगौडा हे खानापूर एसोसिएशन अध्यक्ष आहेत.त्यानंतर एमबीबीएस पदवी घेतलेले डाॅ.दर्शन नाडगौडा व डॉ हरिता नाडगौडा या तिघानी नाडगौडा कुटूंबाचे नाव रोषण केले.
ग्रामीण भागातील छोट्याशा नागवे गावात डाॅक्टर होऊन ग्रामीण जीवनातील संघर्ष यावर मात करत मिळविलेली कामगीरी ही अनेकासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
एमबीबीएस पदवी घेतलेल्या डाॅ.दर्शन व डाॅ.हरिता यांच्यात यशाबद्ल सर्व थरातुन अभिनंदन होत आहे.
