#केवळ साडे तीन महिण्यात रताळ्याचे पिक!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे.कष्टकरी शेतकर्याच्या कामच कौतुक होण गरजेचे.हा शेतकरी नागेनहट्टी ( ता.जि.बेळगाव) गावचा सुपूत्र असुन या शेतकर्याचे नाव आहे.बापू हणमंत पाटील ( नागेनहट्टी) असे आहे.
याशेतकर्याने नागेनहट्टी गावच्या शिवारातील सर्वे नंबर ४० मधील आपल्या मालकीच्या केवळ पाव एकर ( १/४) जमिनीत केवळ साडेतीन महिण्याच्या रताळी पिकांचे उत्पन्न १०० पोती इतके मोठे उत्पन्न घेऊन विक्रम नोंदविला.
# रताळ्याचे उत्पन्न फायदेशीर !
नागेनहट्टी येथील शेतकरी बापू पाटील यानी केवळ साडेतीन महिण्यात रताळीची लागवड पाव एकर जमिनीत केली. यापिकासाठी त्यानी सुरूवातीपासुन कष्ट घेतले, आधुनिक पध्दतीने व खताचा वापर करून पिक वाढविले. आणि चक्क पाव एकर जमिनित १०० पोती रताळीचे उत्पन्न काढले , व बेळगाव येथील मार्केटला पाठविले. आज शेतकर्याच्या रताळाच्या उत्पन्नाबद्दल कौतुक होत आहे.
शेतकर्याच्या पिकाला चांगली मागणी व दर मिळणे आजच्या काळाची गरज आहे.
शेतकरी काबाड कष्ट करतो,रात्रनदिवस शेतात राबराब राबतो,मात्र शेतकर्याच्या मालाला योग्य दर मिळाला नाही, तर शेतकरी कसा सुखी होणार,शेतकरी जन्मतो कर्जात, जगतो कर्जात आणि शेवटी मरतो ही कर्जात, यासाठी शेतकर्याच्या मालाला सरकारने योग्य दर दिला तर जगाचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो सुखी होईल.
