#तब्बल २४ वर्षानी झाली वर्ग मित्राची भेट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता.खानापूर ) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या मलप्रभा हायस्कूलच्या सन २००१-०२ सालातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा तब्बल २४ वर्षानी बरगांव जवळील श्रीमान के.पी.पाटील यांच्या श्री साई मंगल कार्यालयात रविवारी दि.२४ मे रोजी पार पडला.
प्रारंभी माझी विद्यार्थिनीनी गणेश फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर माझी विद्यार्थ्यानी दीपप्रज्वलन केले. तर सरस्वती फोटो पूजन तसेच शिवाजी महाराजांचे फोटो पूजन केले .
यावेळी स्वागत गीत सर्व माजी विद्यार्थ्यांनी तसेच एका चिमुकलीने गाय़ीले.कार्यक्रमाचे औचित्य साधुन सर्व मुला मुलींचे गुलाब पुष्प व ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी स्वर्गवासी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहुन एक मिनिट शांतता पाळण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय व मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी जीवनातील आठवणीना उजाळा दिला.
यावेळी मनोरंजन म्हणून सर्व मुला मुलींनी काही क्षण संगीत खुर्ची खेळण्यात दंग झाले तसेच विविध प्रकारचे ऍक्टिव्हिटी केले.
शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

