#खानापूर म ए समितीचे तहसीलदाराना निवेदन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात नुकताच समाधान कारक पाऊस झाला.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे.मात्र तालुक्यात डीएपी आणि युरीया खताचा मोठ्याप्रमाणात तुटवडा भासत आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.
तेव्हा येत्या दोन दिवसात खताचा पुरवठा करावा. अन्यथा शेतकर्याच्या पेरण्या खोळंबुन शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान होईल .आशा मागणीचे निवेदन खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोमार याना देण्यात आले.
निवेदन देताना खानापूर म.ए.समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई , माजी आमदार दिगंबर पाटील, राजाराम देसाई , समितीचे सदस्य प्रकाश चव्हाण, चिटणीस आ बी साहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील,युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील,अजित पाटील,जयसिंगराव पाटील,प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा मंन्नोळकर,अमृत शेलार, एस.एच. गुरव, पुंडलिक पाटील, नागेश भोसले,संदेश कोडचवाडकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत,रमेश धबाले, व्ही. व्ही.पाटील आदी उपस्थित होते.

