#मोठी दुर्घटना,लाखाचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज:
बिडी ( ता. खानापूर ) येथे शनिवारी दि.१६ रोजी सायंकाळी पाऊणे आठच्या दरम्यान एक कारगाडी भरधाव वेगाने भरबाजारातील सागर पाटील यांच्या साईकृपा हार्डवेअर व पेंटच्या दुकानात घुसल्याने मोठी दुर्घटना घडली.या दुर्घटनेत दुकानातील साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली.त्यात दुकानादाराचे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
या बाबत घटनास्थळावरून प्रत्यक्ष दर्शनी प्रशांत बाळेकुंद्री यांच्याकडुन मिळालेली माहिती अशी की, शनिवारी बाजाराच्या दिवशी बिडी ( ता.खानापूर) येथील सागर पाटील यांच्या मालकीच्या साई कृपा हार्ड वेअर व पेंट या दुकानात कारगाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारगाडी थेट दुकानात घुसली, हा परिसर गजबजलेला असुन शनिवारी बाजारचा दिवस असल्याने आज मोठी गर्दी होती.त्यातच दुकानसमोर अनेक दुचाकी उभ्या होत्या.त्याशिवाय यादुर्घटनेत दुकानात थांबलेला ग्राहक सुध्दा जखमी झाला. लागलीच त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले .
घटनेची माहिती मिळतीच नंदगड पोलिस स्थानकाचे पी एस आय बळीगार , पीएसआय महानंदा तसेच हवालदार एन ए चंदरगी यानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.पोलिस पुढील तपास करत आहेत.


