#प्रत्येक महिण्याच्या तिसर्या शनिवारी ग्राहक मेळावा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरात हेस्काॅम खात्याच्यावतीने प्रत्येक महिण्याच्या तिसर्या शनिवारी ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र ग्राहक मेळाव्याला तालुक्यातील नागरिक पाठ फिरवतात.त्यामुळे केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच तक्रारी येतात. तर वर्षभर तालुक्यातील ग्राहक हेस्काॅम कार्यालयावर निवेदन देणे, मोर्चा काढणे, सुरूच असते.यामागे हेस्काॅम खात्याकडुन ग्राहक मेळाव्याची जनजागृती करणे कमी पडते.लोकांच्यापर्यत ग्राहक मेळाव्याचे महत्व पटवून देण्यास हेस्काॅम खाते कमी पडते.म्हणूनच ग्राहक मेळाव्याला एक किंव्हा दोन ग्राहक येतात.व समस्या मांडतात.तेव्हा हेस्काॅम खात्याने ग्राहक मेळाव्याला ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी जागृती करणे गरजेचे.
शनिवारच्या ग्राहक मेळाव्यात २ तक्रारी!
शनिवारी दि. १६ रोजी खानापूर हेस्काॅम कार्यालयात ग्राहक मेळाव्यात दोनच तक्रारी आल्या होत्या.
यामध्ये खानापूरच्या मुरगोड प्लाॅट मधुन भाऊराव ईरापा पाटील यानी सर्व्हिस वायर बदलुन द्या.अशी मागणी केली होती.
तर दुसरी तक्रार पार्वती गावडे याच्या आर आर मिटर मधील बिघाड दुरूस्त करून द्या. अशा दोनच तक्रारी होत्या.
यावेळी ग्राहक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हेस्काॅमचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले होते.तर ग्राहक मेळाव्याला सहाय्यक अभियंते बी व्ही धर्मदास, सी.एस अंगडी ,
,सेक्शन आँफिसर लक्ष्मीकांत रंगनाथ, नागेश दौलतकर, भरतेश नागनुर,जावेद नाईकवाडी,श्री चक्रीमठ, श्री संतोष तसेच हेस्काॅम कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यांचे आवाहन!
हेस्काॅम खात्याच्या अंतर्गत काही कंत्राटदार , कर्मचारी,तसेच जीव्हीपी प्रतिनिधि यानी ग्राहकाकडुन वीज बीलाची रक्कम गोळा करून ती खात्यात जमा न केल्याबद्ल तोंडी तक्रारी आल्या आहेत.
यामुळे ग्राहकानी तसेच नागरीकानी वीज बीलाचा भरणा केवळ हेस्काॅमच्या बील काऊंटरवर ,बी बी पी एस, अथवा आँन लाईन तसेच ई पेटेंट सुविधा वापरून करावा.
कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडे रोख रक्कम देऊ नये.अन्यथा आर्थिक फसवणुक व गैरसोयीचा सामना करावा लागु शकतो. असा इशारा देण्यात आला आहे.
तेव्हा ग्राहकानी सतर्क राहुन व्यवहार करावेत. असे आवाहन खानापूर हेस्काॅम कार्यालयाचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यानी केले आहे.


