संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
,बेळगाव जिल्ह्य़ातील महाविद्यालयातुन बारावीच्या परीक्षेत मराठी भाषा विषय घेऊन विज्ञान शाखेतून (Science )
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींसाठी शशिकांत सारडा आपले वडील नंदकिशोर सारडा यांच्या स्मरणार्थ तीन हुशार व होतकरू विद्यार्थिनींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहेत.
शशिकांत सारडा हे सांगलीचे सुपुत्र असून सध्या ते अमेरिकेतील WPS या कंपनीत ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
मागील वर्षीही तीन विद्यार्थिनींची निवड करून प्रत्येकी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली होती ,यातील दोन विद्यार्थिनी हुक्केरी तालुक्यातील व एक विद्यार्थिनी बेळगाव तालुक्यातील होती.
यासाठी विज्ञान शाखेतून मराठी विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी लागणारे अर्ज ' बालगोपाळ किड्स ' जांबोटी रोड पिरनवाडी येथे उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज बालगोपाळ किड्स येथे द्यावेत किंवा अर्जाची झेरॉक्स प्रत घेऊन आम्ही ज्या व्हाटस्अप ग्रुप ही बातमी घालील त्या ग्रुप वर अर्ज पाठविला तरी चालेल. अधिक माहितीसाठी डॉ. गोपाळराव पाटील भ्रमणध्वनी क्रमांक 9619588606 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.