#१५ वर्षाच्या कालावधीनतंर लक्ष्मी यात्रेचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या १५ वर्षाच्या प्रदीर्घकालावधी नंतर खानापूर तालुक्यातील बैलुर,बाकनुर
,मोरब,देवाचीहट्टी आदी गावांच्या ग्रामदेवता श्रीमहालक्ष्मी देवी यात्रोत्सव उद्या बुधवारी दि.६ मे ते गुरूवारी दि.१४ मे पर्यत मोठ्या उत्सवाने साजरा होत आहे.
बुधवारी दि.६ रोजी श्री चाळोबा देवस्थान येथे पहाटे भोमानदारांच्या ओट्या स्विकारून श्री महालक्ष्मी देवीचे विवाह स्थळी प्रस्थान होईल व त्यानंतर सुर्योदयाला पहाटे ६ वाजुन ४१ मिनिटानी अक्षतोरोपणाने यात्रोत्सवाची सुरूवात होईल व त्यानंतर गावातुन श्रीमहालक्ष्मीची मंगल वाद्याच्या गजरात वाजत गाजर मिरवणुक काढण्यात येईल व दुपारी दोन वा जता श्रीमहालक्ष्मी देवी गदेगेवर विराजमान होईल.
यावेळी यात्रोत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन गुरूवारी दि.१४ मे रोजी सायंकाळी महाआरती झाल्यानंतर दे नीचे सीमेकडे प्रस्थान होईल, त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.
तरी यात्रेला सर्वानी मोठ्यासंख्येने उपस्थित राहुन यात्रेची शोभा वाढवावी.असे आवाहन श्रीमहालक्ष्मी यात्रोत्सव कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

