#तालुक्यात २३ शाळेच्या १०वीचा निकाल. १०० %
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
यंदाच्या इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेचा तालुक्याचा ९५ टक्के लागला असुन आता प्रथमच्या इतिहासात प्रथमच इतका मोठा १० वीचा निकाल लागला.याचे खरे श्रेय शाळा मुख्याध्यापक, शिक्षक तसेच बीईओ व अधिकारी त्याच बरोबर पालक ,विद्यार्थी आदीना दिले जाते. असे मत आमदार विठ्ठल हलगेकर यानी सोमवारी खानापूर येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सभागृहात आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीईओ पी रामाप्पा होते.
यावेळी आमदार म्हणाले की, मी एक शिक्षक होतो.१०० टक्के निकाल लावण्यासाठी काय करावे लागते याचा मला मोटा अनुभव आहे. त्याअनुभवाची मला आज आठवण येते.यंदाचा १० वीचा निकाल हा ऐतिहासीक असुन यापुढेही असाच निकाल लागण्यासाठी मी आमदार या नात्याने सहकार्य करीन,असे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपिठावर स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीय स्कूलचे चेअरमन अँड.चेतन मणेरीकर,डाईट काॅलेज प्राचार्य अशोक कुमार सिंदगी, बी आर सी एम जी हत्ती,एडीएम विनायक जकाती,तालुका नोडल अधिकारी संतोष नाईक, महांतेश कित्तूर,शिक्षक संघटना अध्यक्ष मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर,श्री पत्री,एस एन कम्मार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यानी केले.
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवराच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजनाने झाली.
यावेळी बिडीच्या होली क्राॅसची दिव्या देसाई हिने ६२४ मार्क घेऊन राज्यात दुसरा तर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल तसेच अनुष्का देसाई (हलशीवाडी) हिने ६२१ मार्क घेऊन तालुक्यात व्दितीय क्रमांक घेलेल्या तसेच टाॅप टेन विद्यार्थ्याचा त्याच बरोबर हायस्कूलचा १०० टक्के निकाल लागल्या २३ मुख्याध्यापकाचा सत्कार मान चिन्ह,प्रशस्ती पत्र,शाल व पुष्पहार घालुन तालुका शिक्षण खात्याच्यावतीने करण्यात आला.
यावेळी, उपस्थित मान्यवराची विद्यार्थ्याना मार्गदर्शनपर भाषणे झाली.
आभार एसीओ संतोष नाईक यांनी मानले.


