#श्रीमाऊली यात्रेनिमित्त आयोजित नाटकाच्या स्टेजवर कार्यक्रमाचेआयोजन”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावचे ग्रामदैवत श्रीमाऊली देवीच्या यात्रेचे औचित्यसाधुन
गर्लगुंजीचे सुपूत्र निवृत्त सुभेदार अजित पाटील यांच्या’ माझे गाव गर्लगुजी’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा यात्रेनिमित्त आयोजित नाटकाच्या स्टेज वर नुकताच पार पडला.
अध्यक्षस्थानी गर्लगुंजीचे ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील होते.
.तर प्रमुख अतिथि म्हणून माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, माजी ग्राम पंचायत सदस्य परशराम चौगुले,प्रसाद पाटील, अजीत पाटील,हणमंत मेलगे, राजू सिध्दाणी, भरमाणी पाटील,नंदकुमार निट्टूरकर,पीकेपीएसचे संजय पाटील , बाबूराव मेलगे, निवृत्ति मेलगे, शांताराम मेलगे, संतोष पाटील , अरूण पाटील आदी,उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात पिराजी पाखरे यांच्या प्रास्ताविकतेने झाली.
या वेळी गर्लगुंजीचे सुपूत्र निवृत्त सुभेदार अजित पाटील यांच्या “माझे गाव गर्लगुंजी या पुस्तकांचा उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन सोहळा पार पडला.
यावेळी गर्लगुंजीचे सुपूत्र निवृत्त सुभेदार अजित पाटील व त्यांच्या सौभाग्यवतीचा उपस्थित मान्यवरांच्याहस्ते शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिराजी पाखरे यानी केले.तर आभार नंदकुमार निट्टूरकर यानी मानले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

