#लोंढ्यांत भर दिवसा हरीण पाण्याच्या शोधार्थ गावात !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सध्या सर्वत्र उन्हाची लाहीलाही होताना दिसत आहे.त्यामुळे जनता हैराण झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे जीव नकोसा होत आहे.वाढत्या उष्णतेमुळे नदी, नाल्यानी तळ गाठला आहे.सर्वत्र पाण्याची समस्या उदभवत आहे.
खानापूर तालुका हा अति जंगलाचा तालुका म्हणून प्रसिध्द आहे.त्यामुळे जंगल भागात ही पाण्याची समस्या उदभवत असल्याने वन प्राणी ही पाण्यासाठी मानववस्तीकडे धावत आहे.
लोंढ्यात भर दिवसा हरीण पाण्यासाठी गावात !
वाढत्या उन्हामुळे जंगलभागातील पाण्याचा साठा आटत आहे.त्यामुळे वनप्राणी सुध्दा पाण्याच्या शोधार्थ मानववस्तीकडे दावत आहेत.
अशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील लोढ्या हालात नुकताच जंगलातुन हरीण पाण्याच्या शोधात गावात शिरले.मात्र भयभीत झालेले हरीण गल्ली बोळातुन पळताना नागरीकाना आश्चर्य वाटले.काही गावातील कुत्री हरणाच्या पाठी मागे लागली.
या उन्हाची झळ केवळ मनुष्यानाच लागत नसुन वन प्राण्याना ही लागत आहे.पाण्यासाठी वन प्राणी आता मानव वस्तीकडे धावत असल्याचे दृष्टीस पडत आहे.
आजुन मे महिणा आहे.त्यामुळे अनेक समस्याना तोंड द्यावे लागणार आहे.

