संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील ५ खो खो खेळाडुनी १४ वर्षा खालील बेळगांव जिल्हा खो खो संघातुन म्हैसुर ये थे झालेल्या राज्य स्तरीय खो खो स्पर्धेत खेळून प्रथम क्रमांक पकाविला.
यानिमित्त गर्लगुंजी सरकारी मराठी मुलांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.या बेळगाव जिल्हा खो खो संघात गर्लगुंजीचे पाच खेळांडू दिग्विजय मोहन भातकांडे, मारुती अजित पाटील ,संतोष संभाजी मेलगे श्री महादेव गोरे, ज्ञानेश्वर संभाजी गोरे, या खेळांडुची निवड झाल्या निमित्त मराठी शाळा, एस. डी. एम सी कमिटी, गर्लगुंजी ग्राम पंचायत आदीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यानी खेळांडुना टी शर्ट व बँग देऊन मदत केली.
खो खो खेळांडुना एकलव्य क्रीडा संघ व माजी क्रिडा शिक्षक अशोक पाटील तसेच खो खो कोच प्रशिक्षक प्रशांत पाखरे याचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच शाळेच्या एस डी एम सी कमिटीचे सहकार्य लाभत आहे.
राज्य स्तरीय खो खो स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल खो खो पटूचे गर्लगुंजी गा वा सह खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
