#यात्रा कमिटीचे तहसीलदार व जिल्हा अधिकार्याना निवेदन!”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हलशी-हलशीवाडी ( ता. खानापूर ) गावची लक्ष्मी यात्रा तब्बल २७ वर्षाच्या काळानंतर दि. ८ एप्रिल २०२६ ते दि.१६ एप्रिल २०२६ या काळात होत आहे.
तेव्हा ९ दिवसच्या यात्रेच्या काळात हजारो भाविकांच्या उपस्थित धार्मिक विधी व रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.
याच काळात एप्रिल २०२६ मध्ये ग्राम पंचायत निवडणुका जाहिर झाल्या. तर निवडणुक आचार संहितेर्गत काळात यात्रा साजरी करण्याची परवानगी द्यावी. अशा मागणीचे निवॆदन हलशी -हलशीवाडी लक्ष्मी यात्रा कमिटीच्यावतीने खानापूर तहसीलदार दुंडाप्पा कोमार तसेच जिल्हा अधिकीर्याना देण्यात आले .
निवेदन देताना हलशी -हलशीवाडी श्री लक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष महेश जाधव ,उपाध्याक्ष अर्जुन देसाई, तसेच सदस्य प्रदीप पाणीपतेदार, श्रीकांत गुरव, हलशी ग्राम पंचायत अध्यक्ष पांडु बावकर,चंद्रकांत देसाई, पंडलिक कामती, बडकु गुरव,परशराम मादार,सोमनाथ भातकांडे, व माजी आमदार अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
