#पत्रकार परिषेदत माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खैरवाड (ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सन १९९७-९८ सालाच्या इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्याचा स्नेहसोहळा येत्या दि.१४ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती खानापूरात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी माजी विद्यार्थी मंजुनाथ बस्तवाडकर यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी पत्रकार परिषदेला माजी विद्यार्थी मंजुनाथ बस्तवाडकर,परशराम कोलेकर, मारूती कोलेकर,रोहित बागे (शिक्षक) तसेच माजी विद्यार्थीनी सौ.मंदिरा भुजगुरव,सौ.अनिता झुंजवाडकर,सौ.गौरी मडवाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी विद्यार्थी मंजुनाथ बस्तवाडकर म्हणाले की, खैरवाड ( ता.खानापूर) येथे सन १९३७ मध्ये स्थापन झालेल्या मराठी प्राथमिक शाळेला आज जवळ पास ८८ वर्षे होऊन गेली. मातृ भाषेचे ज्ञान देऊ केलेल्या शाळेच्या आठवणी आज ही आम्हाला प्रेरणा देतात. मराठी शाळेची प्रगती व्हावी. मराठी शाळा टिकावी. प्रत्येकाना मराठी शाळेकडे यावे.या उद्दात हेतुने सन १९९७-८९ सालच्या इयत्ता ७ वीच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहसोहळा आयोजित करून मराठी शाळेतील आठवणी
जागृत करणे,भविष्यात मराठी शाळेची भरभराट व्हावी.विद्यार्थ्याची संख्या वाढावी.हा यामागचा उद्देश असुन दोन सत्रात हा स्नेहसोहळा साजरा होणार आहे.
पहिल्या सत्रात उदघाटन सोहळा, आजी माजी शिक्षकांचा सत्कार, वक्त्यांचे भाषण व इतर तसेच दुसर्या सत्रात माजी विद्यार्थ्याचा वर्ग,जुन्या आठवणीना उजाळा इतर कार्यक्रम होणार अशी माहिती दिली.
यावेळी माजी विद्यार्थी परशराम कोलेकर म्हणाले की, माजी विद्यार्थ्यानी आपल्या आठवणीना उजाळा देण्यासाठी स्नेहसोहळ्याचे आयोजन केले आहे. यासोहळ्याला आजी माजी विद्यार्थी , आजी माजी शिक्षक, एसडीएमसी सदस्य पालक वर्ग यासर्वांची उपस्थित राहणार आहे.
त्याचबरोबर मारूती कोलेकर,सौ.मंदिरा भूजगुरव,सौ.अनिता झुंजवाडकर आदीनी विचार व्यक्त केले.
शाळेचे सहशिक्षक रोहित बागे यानी शाळेच्या स्थापनेपासुन आता पर्यत शाळेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली.
मारूती कोलेकर यानी आभार मानले.