आज संध्याकाळपर्यत खड्डा बुजविण्याचे आश्वासन!
“खानापूर पी डब्लूडी खात्यांची डोळ झाक,
जांबोटी -खानापूर रस्त्यावर जीवघेणा खड्डा”
कुणाचा बळी गेल्यावर अधिकारी जागे होणार काय?
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर जांबोटी महामार्गावरील रामगुरवाडी क्राॅसजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. गेल्या बर्याच दिवसापासुन याकडे संबधित खात्याचे लक्षच नाही.
यासाठी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटने चेअरमन विनायक मुतगेकर यानी बुधवारी दि .६ रोजी फोन व्दारे राज्य हायवे एईई अधिकार्याशी संपर्क साधुन चांगलीच कान अघडणी केली. लागलीच आज संध्याकाळपर्यत कामगार लावुन खड्डा बुजविण्याचे आश्वासन दिले. त्याची वाट पाहाणारआहे.
खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका म्हणून ओळख असली तरी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्याना या रस्त्यावर खड्डे पडतात.यांची कल्पना असते. परंत गेंड्याच्या कातडीचे अधिकारी व कुणाचाच वचक नसलेले अधिकारी खानापूर तालुक्यात असल्याने या अधिकार्याना कुणाचीच भिती नाही.त्यामुळे खानापूर जांबोटी रस्त्यावर गुडगाभर खड्डा पडला. तरी याची दख्खल घेण्याची बुध्दी या अधिकार्याना नाही.त्यामुळे खानापूर जांबोटी रस्त्यावर एक नव्हे हजारो खड्डे पडून वाहन धारकांची त्रेधा उडत उडत आहे.
हा खड्डा इतका धोकादायक आहे की, वेगवान वाहन धारकाला वळणावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज लागणे कठीण होत. त्यामुळे हा खड्डा कुणाचा तरी बळी घेणार अशी शंका प्रवाशातुन येत आहे.
दुसरीकडे वेगवान वाहन धारक खड्डा चुकविण्याच्या नादात एक तर शेतवाडीत जाणार नाही तर रस्त्याच्या बाजुला असलेेल्या एखाद्या झाडाला ठोकर देणार अशाने हा खड्डा आपघाताला आमंत्रण ठरणार .
यावेळी बोलताना तालुका ग्राम पंचायत सदस्य संघाचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले की,खनापूर तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तालुक्यातील निधी लाटण्यात तसेच तालुक्यातील जनतेला लुटण्यात हुशार आहेत.ते कधी रस्त्याची दुरूस्ती करून लोकांची सेवा करण्यात कधी धन्यता मानत नाहीत. त्याच्या या वागण्याने खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक रस्त्याची अशीच गत झाली आहे.
यासाठी आज फोनव्दारे संपर्क साधुन कल्पना दिली आहे.अधिकार्यानी संध्याकाळ पर्यतची वेळ दिली आहे.