
६० बेडचे रूग्णालय!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरात नविन बांधण्यात आलेल्या माता व बाल ६० बेडच्या रूग्णालयाच्या इमारतीचा उदघाटन सोहळा बुधवारी दि.११ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर होते.तर व्यासपिठावर आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव ,माजी आम.डाॅ.अंजली निंबाळकर,जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, तहसीलदार प्रकाश गायकवाड, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, काॅग्रेस नेते इरफान तालिकोटी त्याचबरोबरजिल्हा अधिकारी,इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.महेश किवडसण्णावर यानी केले.प्रारंभी आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव ,पालकमंत्री सतीश जारकिहोळी ,आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार डाॅ.विठ्ठलराव हलगेकर,सी ई ओ राहुल शिंदे माजी आमदार डाॅ अंजली निंबाळकर आदीच्याहस्ते माता व बाल ६० बेडच्या रूग्णालयाचे उदघाटन फित कापून करण्यात आले.
यावेळी उपस्थितांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर पाहुण्याचे फेटा,शाल , मान चिन्ह व पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, माजी आमदार डाॅ अंजली निंबाळकर व आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी तालुक्याच्या आरोग्य विकासासाठी केलेल्या पाठपुरव्याचा विचार करून खानापूर तालुक्यासाठी सुविधा पुरविण्यासाठी आमचे प्रयत्न सतत राहतील असे विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, तालुक्यासाठी शंभर बेडचे हाॅस्पिटल हे वरदान आहे.या इमारतीसाठी ३० कोटी रूपयाचा निधी मंजुर झाला असुन येत्या महिन्याभरात जुनी इमारत पाडवुन त्याजागी लवकर नवीन इमार उभारण्यात येणार आहे.
त्याचबरोबर इतर सुविधा ही लवकर पूर्ण होणार आहे.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी आपले विचार व्यक्त केले.याजबरोबर माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर व इतरानी आपले विचार व्यक्त केले.