#यात्रा मंगळवारी व बुधवारी दोन दिवस होणार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहराचे जागृत देवस्थान मर्याम्मा देवी मंदिर बेळगांव पणजी महामार्गावरील हलकर्णी फाट्यावर असुन सालाबाद प्रमाणे यंदाही मर्याम्मा देवीच्या यात्रा आज मंगळवारी दि. १० पासुन उत्साहात प्रारंभ झाली .
प्रारंभी मंगळवारी सकाळी मर्याम्मा देवीची पुजा ,अर्चा होऊन यात्रेची सुरूवात झाली. त्यानंतर भाविकाकडुन देवीला नैवेध अर्पण होऊन ,दुपारी २.३० वाजता मुख्य पुजा होऊन भाविकानी देवीच्या दर्शनाला सुरूवात झाली. यावेळी रात्री उशीरा पर्यत भाविकानी रांगेत उभे राहुन दर्शन घेतले.
#वाहतुक ठप्प होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त!
दोन दिवस पणजी बेळगाव महामार्गावरील हलकर्णी फाट्यावरील मर्याम्मा मंदिराच्या आवारात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
म्हणून खानापूर पोलिसानी याची दखल घेऊन वाहतुक सुरळीत व्हावी म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
#बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस!
बुधवारी दि.११ रोजी सकाळी मर्याम्मा देवीच्या ओट्या भरणे व नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहे.
#खेळण्याची दुकाने,पाळणे आकर्षक!
मर्याम्मा देवीच्या यात्रे निमित्त खेळण्याची दुकाने ,पाळणे. विविध प्रकारचे स्टाॅल यात्रेचे आकर्षण होते.
अबाल पासुन वृध्दापर्यत सर्वानी यात्रेचा लाभ घेतला.