# बेळगाव जी आय टी काॅलेजतर्फे विदेश प्रयाण!
#खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी याची कन्या मयूरी घाडी होय!
,संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील प्रसिध्द वकील व खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी आणि घाडी फाऊंडेशनच्या उपाध्याक्षा सौ. पार्वती ईश्वर घाडी यांची कन्या कुमारी मयूरी ईश्वर घाडी हीची बेळगाव जी आय टी काॅलेज तर्फे स्टडी टूर निमित्त दुबई येथे मुंबई मार्गे रविवारी दि.२० जुलै रोजी विदेश प्रयाण होत आहे.
त्यानिमित्त मयुरी ईश्वर घाडी हिला शुभेच्या देण्यासाठी काॅग्रेस नेते यशवंत बीरजे ,खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे चेअरमन व ट्रब्यूनल सदस्य ,निलावडे ग्राम पंचायत सदस्य विनायक मुतगेकर तसेच कालमणीचे कृष्णा भरणकर आदीनी हलकर्णी ता.खानापूर येथील पार्वती निवासस्थानी रविवारी उपस्थिती दर्शवुन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊ केल्या.
कुमारी मयूरी ईश्वर घाडी ही लहानपणा पासुन हुशार विद्यार्थीनी म्हणून परिचित आहे.
तिची प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खानापूर शहरातील सर्वोदय इंग्रजी शाळेत पूर्ण झाले. काॅलेज शिक्षण बेळगाव येथील गोगटे काॅलेज आँफ काॅमर्स मधुन बी काॅम पदवी संपादन करून तिने एम बी ए जी आय.टी काॅलेजमधुन पदवी संपादन करून तिला दुबई परदेशी दौरावर स्टडी टुरची संधी मिळाली.
यानिमित्त मयूरी ईश्वर घाडी या रविवारी परदेशी दौर्यावर रवाना होत आहे.
कुमारी मयुरी ईश्वर घाडी हीचा परदेशी दौरा सुखरूपने यशस्वी होवो.अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी वडिल अँड.ईश्वर घाडी ही उपस्थित होते.
तिच्या या यशा बद्दल खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.