#घोटगाळी ग्राम पंचायतीच्यावतीने सत्काराचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
घोटगाळी ( ता.खानापूर ) येथील पी के पी एस सोसायटीचे चेअरमन व ग्राम पंचायत सदस्य डाॅ. रफिक हलशीकर याना बेडकीहाळ येथील ५ व्या मराठी साहित्य संमेलनात समाज रत्न हा पुरस्कार मिळाल्याबद्दल घोटगाळी ग्राम पंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमुर्ती डाॅ. रफिक हलशीकर यांच्यासह ज्यूडो स्पर्धेत राज्यात व्दितीय क्रमाक मिळविल्या बद्दल निषा नारायण पाटील, व दहावीत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल स्नेहा गुरूदत्त राने आदीचा शाल ,पुष्पहार व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायत चेअरमन सुजाता कुंभार, व्हाईस चेअरमन पुनिल पाटील,सदस्य संतोष मिराशी,डाॅ.रफिक हालशीकर,सदस्या सरस्वती पाटील,शुभांगी मादार,मल्लव्वा कोलकार तसेच ग्राम पंचायत पीडीओ उस्मान नदाफ, सेक्रेट्ररी मल्लाप्पा कुंभार व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
उपस्थित होते.