
#मुर्तीना अभिषेक,महाआरतीचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
गर्लगुंजी ( ता.खानापूर) गावचे ग्रामदैवत लक्ष्मी देवी व मर्याम्मा देवीच्या मंदिराचा वर्धापन दिन सालाबाद प्रमाणे यंदाही सोमवारी दि. २८ रोजी मोठ्य उत्साहात पार पडला.
यावेळी दोन्ही मंदिरातील लक्ष्मीदेवी व मर्याम्मादेवीच्या मुर्तीना सकाळी अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन दुपारी सुवासिनीकडुन ओट्या भरून वर्धापन साजरा करण्यात आला.
गर्लगुंजीत वर्धापन दिना निमित्त सकाळ पासुन गल्लोगल्ली सजावट ,विधुत रोषणाई तसेच रांगोळ्या टाकुन आनंदोत्सवात वर्धापन दिनाची सुरूवात झाली.
वर्धापन दिनानिमित्त पंच कमिटी ,अबाल पासुन वृध्दापर्यत सर्वानी सहभाग घेतला होता.