संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीय स्कूल मध्ये ७७ वा प्रजास्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष एफ .एम.पाटील होते.
कार्यक्रमाला सचिव डॉ.डी. ई. नाडगौडा ,ट्रेजरर डाॅ.पी.एन.पाटील, संचालक डॉ.एन एल कदम, सातेरी पुन्नचे,नारायण चोपडे,व्यवस्थापक सौ. दिव्या नाडगौडा,प्राचार्य बालकृष्ण हलगेकर आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष एफ.एम.पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर उपस्थित यांच्याहस्ते फोटो पूजन करण्यात आले.
या वेळी सचिव डॉ.डी ई नाडगौडा यानी प्रजास्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
प्रजास्ताक दिना निमित्त विद्यार्थ्यानी मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.