#ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्याना निवेदन!
#अँड.ईश्वर घाडी यानी जिल्हाधिकारी महम्मद रोशन यांच्याशी केली चर्चा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हत्तरगुंजी ( ता. खानापूर ) गावासाठी १९ एकर जमीन गायरान म्हणून होती.आज या जमिनीत आय टी आय काॅलेजासाठी जमिन, हिंदू, मुस्लिम स्मशान भूमीसाठी जमीन,इंदिरा नगर सरकारी घरे, एस सी,समाजासाठी तसेच एस टी समाजासाठी स्मशान भुमी,अशा प्रकारे वाटून संपत आली आहे.आता केवळ ४ एकर जमीन शिल्लक आहे.यामध्ये हत्तरगुंजी, मुडेवाडी,गांधीनगर ,डुक्करवाडी या चार गावाच्या जनावरासाठी गायरान कमी पडत असताना काही दिवसापासुन हक्की पक्की समाजासाठी स्थलांतर करण्यात आले.
याला विरोध दर्शविण्यासाठी हत्तरगुंजी ग्रामस्थानी वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर तालुका ब्लाॅक काँग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्यानेतृत्वाखाली जिल्हा अधिकारी महम्मद रोशन यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे.हत्तरगुंजी गावाला १९ एकर जमिन गायरान होते. सरकारी कामासाठी जागा देऊन आता केवळ ४ एकर जमीन शिल्लक आहे.त्यातच हल्की पक्की समाजाचे स्थलांतर जागा बळकविण्याच्या प्रकाराला आम्ही विरोध करत आहे.कोणत्याही परिस्थिती गायरानची जागा देऊ शकत नाही.असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी वकील संघटनेचे अध्यक्ष व खानापूर ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, समाज सेवक यशवंत बीरजे, ग्राम पंचायत सदस्य. प्रवीण अगणोजी,मा जी ग्राम पंचायत सदस्य भैरू कुंभार,हत्तरगुंजी, मुडेवाडी,डुक्करवाडी,गांधीनंगर,आदी गावचे शेतकरी व नागरीक उपस्थित होते.

