#आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली भेट!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापुर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांच्या मार्गदर्शना खाली बुधवारी दि ६ रोजी भारताचे मानव आणि बाल विकास केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेतली व अंगणवाडी मराठी मधुन शिकलेल्या सहाय्यीकीना शिक्षक म्हणून बडती देण्यात यावी. तसेच कमी पट संख्या असलेल्या अंगणवाडीना कमी न करता दुसरी कडे स्थलांतरीत करावे. आणि अंगणवाडी शिक्षकांना कनिष्ठ वेतन द्यावे. पोषण ट्रॅकरमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. फेस कैप्चर ओटीपी नेटवर्क अशा आडचणी लाभार्थ्यीना सामोरे जावे लागते. फेस कैप्चर मुळे रेशन पुरवठा करण्यात कठीण समस्या निर्माण होत आहेत. आशा अनेक समस्या विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर,खासदार इराणा कडाडी व अंगणवाडी युनियनच्यावतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष जय्यामा एम, राज्यसभा सदस्य ईराना कडाडी , सौ. रुक्मिणी विठ्ठलराव हलगेकर , मेघा मिठारी,अनिता पाटील,भारती पै आणि सुमित नाईक, प्रदीप हलगेकर आदी उपस्थित होते.