# स्पर्धा मराठा मंडळ संचालित कुप्पटगिरी हायस्कूलच्या पटांगणावर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा पंचायत सार्वजनिक शिक्षण खाते व क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली बरंगाव क्लस्टर लेवल क्रिडास्पर्धा उद्या गुरूवारी दि ७ रोजी सकाळी १० वाजता मराठा मंडळ संचालित कुप्पटगिरी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव पाटील (पंच कमिटी सदस्य) कुप्पटगिरी.
तर उदघाटक म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दिपप्रज्वलन शिवाजीराव शे.पाटील (संचालक म.मं.बेळगांव), परशराम गुरव(संचालक म.मं.बेळगांव), सदानंद पाटील एम डी लैला शुगर, चन्नबसय्या स्वामी पीडीओ बरगाव,प्रमोद कोचेरी (भाजप जिल्हा उपाध्यक्ष), बसवराज सान्निकोप तालुका अध्यक्ष आदीच्या हस्ते होणार आहे.
विविध फोटोचे पुजन पद्मश्री पाटील सदस्य , संजय कुबल भाजप माजी तालुका अध्यक्ष, मल्लापा मारीहाळ कार्यदर्शी भाजपा, भाऊ पाटील सदस्य,मदन पाटील माजी सदस्य, यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी धव्जारोहन पी.रामाप्पा बीईओ खानापूर, यांच्याहस्ते होणार आहे. क्रिडाज्योत प्रज्वलन सौ.सुरेखा मिरजे क्रिडा अधिकारी, व सौ ज्योती कदम सी आर पी बरगांव, याच्याहस्ते होणार आहे.
क्रिडासाहित्याचे पुजन कल्लापा पाटील ,गोविंद किरमिटे, गुंडू तोपिनकट्टी कार्यदर्शी भाजपा खानापूर यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बरगांव ग्रा.प. अध्यक्षा सौ.चागुणा पाटील, महांतेश पाटील ग्रा पं.सदस्य,कल्लाप्पा पाटील चेअरमन पीकेपीएस बरगांव किरण अगनोजी,गोविंद पाटील उपाध्यक्ष ,सदस्या सौ.गोपिका मुतगेकर,गौरा मादार, एसडीएमसी अध्यक्ष मोहन देवलतकर,दोड्डहोसुर, सातेरी सुंडकर हत्तरगुंजी,मारूती लोकोळकर बरगांव याजबरोबर गजानन पाटील,सखाराम पाटील,ओमान कुंभार,मारूती मुतगेकर,शंकर गुरव ,लक्ष्मण पाटील,विष्णू कुंभार,परशराम अल्लोळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक ,कुप्पटगिरी पंच कमिटी,शाळा व्यवस्थापन कमिटी इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.