
हनुमान देवस्थान कार्तिकोत्सव (मारूतीचा पर्व)!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
लोकोळी जैनकोप ( ता.खानापूर ) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही हनुमान देवस्थान कार्तिकोत्सव ( मारूतीचा पर्व )सोहळ शनिवारी दि २३ रोजी साजरा होणार आहे.
यावेळी सकाळी ७ वाजता श्री हनुमान देवाला अभिषेक व पुजा करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी ८ ते ९ या वेळेत बालोपासना ,दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजे पर्यत वारकरी भजनी मंडळ लोकोळी यांच्याकडुन भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर सायंकाळी ७.३०ते रात्री १० वाजते पर्यत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
दर वर्षा हनुमान कार्तिकोत्सव सोहळ्याला हजारो भाविक महाप्रसादासाठी उपस्थिती लावतात.
यावर्षीही भाविकानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवुन लाभ घ्यावा .
असे आवाहन पंच कमिटी व चव्हाटा युवक संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.