
तीन महिण्यात एकदा खानापूर दौर्यावर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कारवार लोकसभा मतदार क्षेत्राचे खासादार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे १४ जुन रोजी पहिलांदाच खासदार खानापूर दौर्यावर आले होते.त्यावेळी अधिकार्याच्या बैठकीत तीन महिण्यातुन एकदा खानापूर दौर्यावर येणार असल्याचे बैठकीत सांगीतले होते.
त्याप्रमाणे तीन महिण्याच्या काळानंतर खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे उद्या सोमवारी दि २ सप्टेंबर रोजी खानापूर तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत.
सोमवारी दि.२ रोजी सकाळी १०.३० वाजता कोडचवाड (ता.खानापूर ) येथे ग्रामस्थाच्यावतीने आयोजित सामुदायिक सत्यनारायण पूजा व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
त्यानंतर चिगदिनकोप ,हिरेमन्नोळी, आवरोळी ,बिडी गावाना भेटी देणार आहेत.
त्यानंतर नागरीकांच्या समस्या ऐकूण घेणार आहेत.
त्याचबरोबर काद्रोळी मठाला भेट देणार आहेत. तेथून ते कित्तूरला रवाना होणार आहेत.
अशी माहिती बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यानी माहिती दिली.