#दान पेटीतील रोख रक्कम, सीसी
टीव्हीचीहार्ड डिस्क लंपास!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नागुर्डावाडा (ता.खानापूर )येथील गावचे ग्राम दैवत नागेश देव महारूद्र मंदिरात बुधवारी रात्री अज्ञात चोरानी चोरी करून मंदिराच्या दानपेटीतील रक्कम व सीसीटीव्ही कॅमेर्याची हार्ड डिस्क पळविल्याची घटना घडली आहे.
सदर घटना रात्री घडल्याने गुरूवारी सकाळी पुजेसाठी गेलल्या नागरीकाना मंदिराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले.
चोरीची माहिती मिळताच गावकर्यानी लागलीच मंदिराकडे धाव घेतली.मात्र चोरानी मंदिराच्या गाभार्यात प्रवेश न केल्याने गाभार्यातील देवाचे दागिऩे व मुर्ती तसेच मौल्यवान वस्तु सुरक्षित राहिल्या,केवळ ओळख पटू नये,व पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने चोरानी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेची हार्ड डिस्क ही घेऊन गेले.
या घटनेने नागुर्डावाड्यात भितीचे वातावरण पसरले आहे.तेव्हा पोलिसानी याचोरीचा कसुन तपास लावावा.पोलिसीचा बंदोबस्त वाढवावा अशी मागणी नागरीकांतुन होत आहे.