डेपो मॅनेजर संतोष बेनकनकोप
#पंचहमी योजनाआढावा बैठक संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात पंचहमी योजनेची आढावा बैठक बुधवारी दि ७ रोजी पार पडली.
, बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी हे होते.या बैठकीमध्ये पाच गॅरंटी योजनेचे अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन गॅरंटी योजनेचे सदस्यांनी आपल्या विभागात काही अडीअडचणी असतात त्या मांडल्या त्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
*शक्ती योजना या योजनेची सविस्तर माहिती डेपो व्यवस्थापक संतोष बेनकनकोप यांनी दिल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये शक्ती योजना महिलांनी 672495 प्रवास केला आहे, फ्री प्रवास केलेल्या त्याची रक्कम 19019188 इतकी झाले आहे अशी माहिती दिली, यावेळी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी गुंजी माऊली देवी जत्रेसाठी व कक्केरी जत्रेसाठी जास्तीत जास्त बस सोडाव्यात अशी सूचना करण्यात आली, त्याचबरोबर नांदगड मध्ये सुपर बस जात नसल्याची तक्रार केली आहे , व माळ अंकले या गावाला सायंकाळी बस सोडावी तसेच हेमडगा डोंगरगाव, अनमोड बसला जास्तीत जास्त गर्दी आहे त्यासाठी सायंकाळी पाच वाजता एक बस सोडावी, त्याचबरोबर सायंकाळी व सकाळी संगरगाळी कोणतीही बस व्हाया गावाला सोडावी या गावातील विद्यार्थ्यांसाठी गैरसोय आहे ती पूर्ण करावे, असे ठराव मांडण्यात आले आहे.
*गृहज्योती या योजनेची माहिती लक्ष्मण रंगनाथ असिस्टंट इंजिनियर यांनी दिल्याप्रमाणे 63743 इतके लाभार्थी आहेत त्यांचे वीज बिल माफ 212,37000 रुपये सप्टेंबर महिन्याचे माफ झाले आहेत, व गृह ज्योती पुनर्र पडताळणी अजून 1115 इतके बाकी आहेत त्यांनी आपली पुनर पडताळणी या महिन्याच्या लास्ट तारखेपर्यंत आहे ती लाभार्थ्यांनी करून घ्यावी असे सांगितले, यावेळी सदस्यांनी काही प्रश्न मांडले त्यामध्ये कुठीनोनगर या गावांमध्ये गेले तीन वर्षे एक लाईट खांब पडलेला आहे तो अजून बसवलेला नाही का? आणि त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तो खांबा वेळेवर बसवावा. तसेच आपल्या हेस्कॉम विभागात एका विभाग ऑफिसरला किती पंचायतींचे काम आहे ती माहिती पुढच्या मिटींगला द्यावी तसेच गेल्या महिन्याच्या मीटिंगमध्ये विभाग अधिकारी चकली मठ यांच्यावर आपण काय ॲक्शन घेतला त्याची माहिती आम्हाला दिली नाही ती लेखी स्वरूपात माहिती द्यावी. व जंगलातील खांबे बदलण्यासाठी काही माहिती मागवली होती ती आपण दिली नाही? ती माहिती आम्हाला मिळाली पाहिजे असे अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर ठराव घालून दिले आहे.
*योजना अन्नभाग्य याची माहिती उप तहसीलदार आहार विभाग शरणाप्पा बागेवाडी यांनी दिल्याप्रमाणे 6471 अंतोदय कार्ड, 56151 बीपीएल कार्ड, 2085 ए पी एल कार्ड आहेत असे सांगितले यावेळी प्रकाश मादार यांनी गेल्या मिटींगला हजार का नाही होता? तसेच गॅरेंटी योजनेच्या सदस्याला जिथे आपण जाता रेशन दुकानाला तिथे गॅरेंटी योजना सदस्याला का बोलवत नाही? असे बरेच प्रश्न त्यांना केले, आणि या प्रश्नावरती योग्य माहिती कोणतीही न दिल्या कारणाने त्यांच्यावर कारवाईचा ठराव मांडण्यात आला, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यातील ई-केवायसी रेशन कार्ड संदर्भात विचारले असता 20 सप्टेंबर लास्ट असल्याचे सांगितले यावेळी सदस्यांनी विचारले या तारखेचा आपल्याला सरकारने आदेश दिला आहे का? आदेश दाखवा असे सांगितले असता आदेश त्यांना काय मिळाला नाही.त्याचबरोबर विवेक तडकोड यांनी विचारले हिरेहट्टी होळी या गावात रेशन दुकानदार तीन किलो रेशन तांदूळ कमी देत आहे यावर आपण काय ॲक्शन घेतला आपल्याला कळवून सुद्धा काही पण आपण केला नाही, या दुकानाला आपण भेट दिला मी तक्रार केलेले असताना मला का बोलावलं नाही असे विचारले असता डेप्युटी तहसीलदार उडवा उडवी ची उत्तरे दिली पण दुकानदारावर ॲक्शन काही पण केलेले नाही.
*गृहलक्ष्मी या योजनेची माहिती ए सीडीपीओ शारदा मराठे मॅडम यांनी दिल्याप्रमाणे 67432 इतक्या महिला लाभार्थी असून त्यांच्या खात्यावर महिन्याला 134864000 जमा होतात, त्यामध्ये आत्तापर्यंत जून महिन्याचे पैसे जमा झाले आहेत तीन महिन्याचे जमा व्हायचे आहेत ते या महिन्यामध्ये जमा होतील असे सांगितले, सदस्यांनी मराठे मॅडम यांना विचारले सिम कार्ड घ्यायलाच पाहिजे का? असे विचारले असता सिम कार्ड फोर्ड केला तर चालतं असे सांगितले, लेखी आदेशाचा सरकारचा आहे का असे विचारले असता आम्हाला फक्त मिटींगला सांगितले आहेत अजून काय लेके आदेश आलेला नाही पण प्रत्येक मिटींगला गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या नावावर सिम कार्ड पाहिजे असा आम्हाला ऑफिशियल सांगितला आहे पण लेखी आदेश नाही आहे.
*युवा निधी या खात्याचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते पण त्यांनी पाठवलेल्या रिपोर्टनुसार तालुक्यातील 4 300 युवा वर्ग निधी घेत आहेत असे कळले यावेळी गॅरंटी योजनेच्या आढावा बैठकीला सदस्य प्रकाश मादार रुद्राप्पा पाटील जगदीश पाटील प्रियांका गावकर शांताराम गुरव गोविंद पाटील युसुफ हारगी बाबू अत्तरवाड विवेक तडकोड संजय गावडे तसेच तालुका पंचायत चे कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मैत्री उपस्थित होते.