#शेतकर्याना आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे. यातालुक्या जंगली प्राण्याकडुन पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.दरवर्षीच शेतकर्याना या समस्यांना सामोरे जावे लागते.तेव्हा तालु क्या च्या जंगलभागातील शेतकर्यानी सरकारच्या योजनेतुन सोलार कुंपण बसवुन घेण्यासाठी ५० टक्के सवलत सरकार देणार आहे.
तेव्हा शेतकर्यानी ५० टक्के खर्च स्व ता करायला पाहिजे , जे शेतकरी इच्छुक आहेत.त्या शेतकर्यानी वनखात्याशी संपर्क करावा. असे आवाहन खानापूर आर. एफ .ओ तेज वाय.पी यानी कालमणी ( ता.खानापूर ) ये थे शेतकर्याशी बोलताना आवाहन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले सध्या
धुमाकुळ घालुन नुकसान करणार्या हत्तीच्या कळपाला चिथावणी देणारे इशारे करू नयेत. अथवा हुसकावुन लावण्यासाठी हत्तीच्या जवळ जाऊन जीव धोक्यात घालु नये. असे आवाहन केले.
यावेळी कालमणी, आमटे गावचे शेतकरी उपंस्थित होते.